शेकापूर येथे नवनिर्वाचीत सरपंचांचा जाहीर सत्कार

शेकापूर येथे नवनिर्वाचीत सरपंचांचा जाहीर सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : शेकापूर ता. उदगीर येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व विजयी उमेदवार यांचा शरदराव देशमुख यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अंबादास देशमुख शेकापूरकर लाभले होते. प्रमुख पाहुणे माजी आ.शिवराज तोंडचिरकर, ह.भ.प.किशन महाराज वलांडीकर, विश्वनाथ मुडपे, व्यंकटराव पाटील आवलकोंडेकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी किशन उगले (समिक्षक) व रत्नमाला मठपती (शिक्षिका) यांना विविध पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल यथोचित सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच परिसरातील मलकापूर गुरूनाथ बिरादार (सरपंच), तिवटग्याळ प्रशांत पाटील (सरपंच), बनशेळकी विकास शेळके (सरपंच) नेत्रगाव सौ. हेमलताताई पाटील (सरपंच), हैबतपूर गजानन नरहरे (सरपंच), अभिजित साकोळकर देवर्जन (सरपंच) तसेच शेकापुर गावच्या सरपंच सौ. उर्मिलाताई शेळके, संदीप हलकरे (उपसरपंच), सदस्य अंकुशराव कोनाळे, मनोहर शिंदे, अविनाश शेल्हाळे, सौ आशाताई नवाडे, सौ. सविताताई सावंत, सौ. अंजली घुगे, सौ.केवळबाई हणमंते यांचा अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘एकच ध्यास गावचा विकास’ गाव समृद्धीसाठी शासकीय लाभ गावच्या समस्यावर उपाय, दारूबंदी, व्यसनमुक्ती गावच्या विकासासाठी प्रयत्न करुन गाव आदर्श बनवावे, त्यासाठी धडपड करून गाव एकजुटीने नांदविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शरदराव देशमुख (आयोजक), संदिप हलकरे (उपसरपंच), बाळासाहेब नवाडे (चेअरमन), निवृतीराव सावंत, आदित्य देशमुख, विठ्ठल शेळगे यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक, मान्यवर मंडळी उपस्थित होते. या वेळी शरदराव देशमुख यांचाही गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याच वेळेस विष्णू सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशन उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर शिंदे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!