लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) :येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती निताताई वट्टमवार हे उपस्थित होते. मान्यवर पाहुण्याच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. कार्य कर्माचे प्रमुख पाहुणे श्रीमती नीताताई वट्टमवार यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यानी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीप्रमाने आपणही आचरण करावे, देश कार्यासाठी सतत प्रयत्न करावे असे सांगितले. कार्यकर्माचे संचलन व आभार सौ. स्वामी बाई यांनी केले.
