संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शाळेत वेशभूषा ,वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाषण स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून मीना तोवर,अर्चना सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभागी होत आपले विचार मांडले. या भाषाण स्पर्धेत व वेशभूषा स्पर्धेत प्रथम यशस्वी सूर्यवंशी, आदिती महाजन, सानवी पांचाळ द्वितीय रिशिता क्षेत्रफळे, श्रावस्ती ससाने, आफिफा शेख तृतीय परिणीती तिडके, मुस्कान शेख, वैभवी फुलमंटे,सानवी माचवे तर स्वामी विवेकानंदाच्या वेशभूषेत सार्थक नाईकवाडे, सिद्धांत कांबळे, सूर्यकर्ण नागरगोजे या विद्यार्थ्यास मुख्याध्यापिका आशा रोडगे व वर्ग शिक्षक यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सुजाता बुर्गे व संजीवनी गुरमे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना होनराव यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी व आभार शबाना शेख यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!