महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा सिंदखेड राजा येथे अभ्यास दौरा

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा सिंदखेड राजा येथे अभ्यास दौरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर १२ जानेवारी २०२३ रोजी स्वराज्याच्या संकल्पक वीरमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेब यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे अभ्यास दौरा संपन्न झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये निरंतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे व ‘फुले पॅटर्न’ चे निर्माते प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक स्थळांना भेटी या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंदखेडराजा या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यात आली.

यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह सहल प्रमुख डॉ. पी. पी. चौकटे डॉ. सतीश ससाणे, डॉ. बब्रुवान मोरे, प्रो. डॉ. नागराज मुळे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. डी. एन. माने, प्रा. अतीश आकडे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी या ऐतिहासिक अभ्यास दौऱ्यात विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देत सहभागी होते.

About The Author

error: Content is protected !!