सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आणि अमितभैयाच्या मार्गदर्शनामुळे सहकार क्षेत्राला देश पातळीवर मोठा सन्मान – विवेक जाधव

उदगीर (एल. पी. उगीले) : वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुटचे, मानाचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ तोंडावर पाटी उदगीर या सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे तसेच बहादूर शेख यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा चमत्कार केवळ आणि केवळ सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख आणि लातूरचे वैभव माजी पालकमंत्री आ. अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. असे विचार उदगीर तालुक्यातील गंगापूर भाकसखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आणि अमितभैयाच्या मार्गदर्शनामुळे सहकार क्षेत्राला देश पातळीवर मोठा सन्मान - विवेक जाधव

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे गळीत हंगाम २०२१-२२ चे मानाचे राज्यस्तरीय पारितोषीके जाहीर झाले आहेत. यामध्ये ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता पारीतोषिक पुरस्कार उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट २ ला जाहीर करण्यात आला आहे. या पारितोषीकामूळे सहकार आणि साखर कारखानदारीत विलास साखर कारखान्याचा दबदबा निर्माण झाला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणेकडून गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यानी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करून विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ची या पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या सोहळयात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक प्रदान करण्यात येणार आहे. अशी ही माहिती याप्रसंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर भाकसखेडाचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिली आहे.

मांजरा परिवारातील साखर कारखान्यामूळे लातूर तालुक्यातील उस गाळपाचा प्रश्न सुटला होता. परंतु जिल्हयातील उदगीर, जळकोट, देवणी या भागातील शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेवर गाळप व्हावे, यासाठी विलास सहकारी साखर कारखाना लि.युनीट २ च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले आहेत. लातूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिवाराचे उल्लेखनीय योगदान आहे. या परीवारातील (तोंडार पाटी) ता.उदगीर येथील कारखान्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे.

स्व. विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आ. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आ. धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक
विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला वसंदादा शुगर इन्स्टियुट कडून उत्तर पूर्व विभागातील तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक प्रथम क्रमाकांचे मिळाले आहे. कारखान्याने गत गळीत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेचा वापर केला, हंगामात पाण्याची बचत करून पाण्याचा पूर्नवापर केला, मागील दोन वर्षाच्या तुलनेत साखर उताऱ्यात ०.७७ टक्के वाढ केली, साखर उतारा १२.२० टक्के मिळवला, गाळप क्षमतेचा वापर १०६. ३७ टक्के केला, ऊसतोडणी वाहतुक यंत्रणेचा कार्यक्षमतेने वापर केला, हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली, या सर्व कामाची पडताळणी करून कारखान्याची या पारीतोषीकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून निवड करण्यात आली आहे. या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ५,३७,०५५ मे. टन ऊसाचे गाळप होवून ६,५५,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर ऊतारा १२.२० टक्के मिळाला होता. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात तांत्रीक कार्यक्षमता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यात आले, यामध्ये विलास कारखाना युनीट २ ची कामगिरी सरस ठरल्याने तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक कारखान्यास देण्यात आले आहे.

हा पुरस्कार माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा.चेअरमन रविद्र काळे, युनीट २ चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, सर्व संचालक मंडळासह स्वीकारणार आहेत.

या पारितोषिकाने विलास कारखान्यास गौरविण्यात आले, याबददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व संस्थापक आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी कारखान्याचे आधिकारी कर्मचारी वर्ग ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार तोडणी मजूर व कंत्राटदार या सर्वाचे व्यवस्थापणाचे वतीने सर्वांचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!