देवणी नगर पंचायतीवर प्रचंड आक्रोश, डंका मोर्चा व सत्याग्रह आंदोलन
आंदोलन कर्त्यांचा आत्मदहनाचा ईशारा
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी नगर पंचायत येथील गावठाण वाटपातील जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी नऊवर्षापासुन संर्घष सुरुच असुन सर्वे.न.२२६/२३८/१ मधील दोन हेक्टर गावठाण आरक्षित क्षेत्रातील जमिन भूखंड वाटप करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व विभागीय आयुक्त यांनी लेखी आदेश करुन देखील नगर पंचायत देवणी यानी सदर भूखंड वाटप झालेल्या पात्र लाभार्थीना प्रत्येक्ष ताबा देण्यासंदर्भात नगर पंचायतीकडुन कायदेशीर कारवाई झाली नाही.त्या मुळे ०१ते८७लार्थीच्या मनात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्याकडील प्रकरण क्र .एस. एच आर.सी./एम.ए.एस./०८/२०२२/१५६९ दिनांक२२/०८/२०२२प्रकरण क्र. २१९/२०१५ ज्ञानेश्वर सुर्यवंशी विरूद्ध जिल्हाधिकारी लातुर या प्रकरणातील दिनांक ०१ऑगष्ठ २०२२ चा आदेश तसेच विभागीय आयुक्त यानी आदेश देऊनही लाभार्थ्याना जमिन भूखंडाचा ताबा आजतागायत न देता, परितक्त्या महिला, दलित,यांच्यावर अन्याय केल्याबद्दल दिनांक २३/०१/२०२३ सोमवार या दिवशी श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र संलग्न राष्ट्रीय दलित मानवी हक्क आभियानच्या वतीने प्रचंड आक्रोश, डंका मोर्चा संविधानिक पध्दतीने काढुन नगर पंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. बेमुदत अमरण उपोषण,धरणेआंदोलन, सत्याग्रह व आत्मदहन करण्यात येणार असल्याचे निवेदन ज्ञानेश्वरभाऊ सूर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय डायरेक्ट,दशरथ कांबळे जिल्हाध्यक्ष श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र,पद्माकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते , उमाकांत कांबळे, यांनी तहसीलदार देवणी , मुख्य अघिकारी नगर पंचायत देवणी,पोलीस निरीक्षक देवणी यांना दिले आहे. तर बायनाबाई पवार,धोंडाबाई कांबळे,संध्याराणी घोरपडे ,रेखाताई कांबळे,सुमन पतंगे,शाखुबाई राणे,सुषमा कांबळे,सुरेखा चोरमल्ले ,सुमनबाई टप्पेकर, जयश्रीअंतरेड्डी,प्रभाबाई गायकवाड यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
