अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथील सहा वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथील सहा वर्षाच्या मुलीवर एका २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना दि o७ मार्च रोजी घडललेली आहे सदरील आरोपी विरूद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीला पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घडली आहे गावातीलच नराधम तरूण अतुल बाबुराव कवडे (२५ वर्ष) याने ७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पिडीतेस वय वर्ष सहा ही तिच्या राहत्या घराच्या बाहेर खेळत असताना घरामागे राहणारा सदरील आरोपी चल तुला दहा रूपये देतो, तुला चाॅकलेट घेऊन देतो असे म्हणुन आमिष दाखवून घरासमोरुन उचलून घेऊन त्याच्या घरी घेऊन जाऊन अतीप्रसंग केला व कोणास सांगितले तर जीवे मारून टाकिन अशी धमकी दिली असल्या संदर्भात पिडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांत दि. १९ मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील आरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना पोलीस उपनिरिक्षक एकनाथ डक यांनी पोकॉ परमेश्वर वागतकर, ड्रायव्हर पोकॉ अभिजीत लोखंडे आदीसह फोन लोकेशन वरून हैद्राबादला पळून जाताना उदगीर जवळ परिवहन महामंडळच्या बस मधून अरोपीला दि. १९ मार्च रोजी अटक केली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरिक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक एकनाथ डक हे करीत आहेत.