आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने धनादेश देऊन मदतीचा हात दिला जात आहे.यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार विलास तरंगे ,अव्वल कारकून सांळूके,तलाठी अनीता निगुळे,हांदेश्र्वर इ.कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील महादेव प्रभूआप्पा बेलुरे, शोभाजी रावण कांबळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश देऊन मदत देण्यात आली. तहसील कार्यालयाच्या वतीने सातत्याने शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. तसेच समाजातील दानशूरांनीदेखील मदतीसाठी सामोरे यावे, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.