लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांत व भूगोल दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांत तसेच भूगोल दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी भुगोल विभाग प्रमुख छाया दिक्कतवार तर प्रमुख अतिथीस्थानी भूगोल शिक्षिका श्रद्धा पाटील व सुरेखा शिंदे उपस्थित होत्या.
प्रारंभी प्रतिमापूजनानंतर मकर संक्रांतीच्या सणाविषयी सुरेखा शिंदे यांनी तर भूगोल दिनाविषयी श्रद्धा पाटील यांनी माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोपात छाया दिक्कतवार यांनी या सणांमधील विज्ञान समजून घेण्यास सांगितले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केदार वाघमारे यांनी केले.
यावेळी मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत संघ प्रथम आल्याबद्दल मधूरा तेलंग व भूमी सुडे या विद्यार्थीनीचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड व पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर व सर्व शिक्षक बंधु-भगीनी कर्मचारी,विद्यार्थी, उपस्थित होते.यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तिळ गुळ वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भूगोल विषयशिक्षकांनी मेहनत घेतली.