7 व्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी लघुपट पाठवण्याचे आवाहन!

7 व्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी लघुपट पाठवण्याचे आवाहन!

उदगीर, रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित 7 वे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सावाचे आयोजन दि 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11वा रघुकुल हाॅल उदगीर येथे करण्यात आले आहे. लघुपट प्रथम 21000 ₹ माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वतीने, द्वितीय 11000 ₹ माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वतीने ,दिग्दर्शन प्रथम 3001 ₹, द्वितीय 2001 डाॅ दिपक सोमवंशी यांच्या वतीने , पुरुष अभिनय प्रथम 3001 ₹, द्बितीय 2001 ₹ सतिश उस्तुरे यांच्या वतीने, स्त्री अभिनय प्रथम 3001₹ द्वितीय 2001₹ अॅड दत्ताजी पाटील यांच्या वतीने, कथा व संवाद प्रथम 3001₹ कुणाल बागबंदे यांच्या वतीने2001₹ प्रा बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने बाल कलाकार प्रथम 3001₹ व द्वितीय 2001₹ प्रजित व प्रणिता याच्या स्मृती प्रित्यार्थ डाॅ पांडूरंग कलंबरकर यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत. सहभागी लघुपटांना गौरव चिन्ह व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी लघुपट 3 ते 30मिनिटापर्यंतचा असावे. लघुपटाचा डाटा क्रप्ट झाल्यास संयोजक जबाबदार रहाणार नाहीत . पारितोषिक प्राप्त महाराष्ट्रातील लघुपट निर्मात्यांना पारितोषिक स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे लागेल . lokaksharnews@gmail.com मेलवर किंवा 9823160552 या वाॅट्सअॅप या क्रमांकावर फिल्म पाठवावे. असे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा. ज्योती मद्देवाड अ,ॅड विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे ,रसुल दा पठान, रविंद्र हासरगुंडे , रामदास केदार लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे , संदीप मद्दे , सिद्घार्थ सुर्यवंशी , सचीन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर,,जहाँगीर पटेल , निता मोरे ज्ञानेश्वर बडगे ,विवेक होळसंबरे टी डी पांचाळ , बालाजी भोसले , अर्चना पाटील , हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे आदीनी केले आहे.

About The Author