जयहिंद प्रयाग प्राथमिक विद्यालय व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

जयहिंद प्रयाग प्राथमिक विद्यालय व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त “कवी आपल्या भेटीला” या कार्यक्रमांतर्गत कवी प्राध्यापक अनिल चवळे यांची प्रदीर्घ मुलाखत शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली. मराठी भाषा, कविता, साहित्य, कथा, या विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना समर्पक प्रश्न विचारून चर्चा केली. मुलाखतीनंतर मराठी भाषा ही आपली बोलीभाषा व मातृभाषा आहे. तिच्या संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे. असे मत मुख्याध्यापक प्रशांतजी माने यांनी मांडले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले अध्यक्ष म्हणून उप स्थित होते.तसेच मुख्याध्यापक प्रशांत माने, श्रीमती वंदनाताई भदाडे , मराठी भाषा विषयाच्या शिक्षिका श्रीमती होळदांडगे सुवर्णा, श्री.नितीन सुडे,राजु डखोरे,मनोज कदम,अभय कच्छवे, व शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!