‘कृषिक २०२३’ प्रदर्शनाला आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली भेट !

‘कृषिक २०२३’ प्रदर्शनाला आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली भेट !

अहमदपूर (गोविंद काळे) : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (बारामती), कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्यावतीने बारामतीत (माळेगाव) देशातील सर्वांत मोठे कृषि प्रात्यक्षिकांवर आधारीत ‘कृषिक २०२३’ हे कृषी प्रदर्शन सुरु आहे. आज माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत कृषी प्रदर्शनाला अहमदपूर चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट दिली. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार, सौ.सुनंदाताई पवार यांच्याशी संवाद साधला बी-बियाणे, खते, किड व रोग नियंत्रण यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसंच शेतकऱ्यांना Artificial Intelligence, Vertical Farming, Urban Farming, रोबोटचा शेतीतील वापर, फळप्रक्रिया क्षेत्रातील तंत्रज्ञान, दूध व भाजीपाला प्रक्रिया उदयोग, मिलेट दालन, Natural Farming अशा अनेक नाविण्यपूर्ण गोष्टी या प्रदर्शनात पाहिल्या. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी ‘कृषिक २०२३’ यांसारखी प्रदर्शनाचे आयोजन करून शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. आपणही या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन या माध्यमातून आमदार यांनी केले.

About The Author