मराठी भाषा जगभर पोहचवत समृद्घ करण्यासाठी लघुपट प्रभावी साधन – प्रा. बिभीषण मद्देवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी भाषा जगभर नेण्यासासाठी लघुपट महत्वाचे साधन असुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट महोत्सावात मराठी भाषेतील लघुपट तयार होणे महत्वाचे असल्याचे मत प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित लघूपट निर्मिती तंत्र आणि मंत्र या विषयावर बोलत होते . यावेळी मंचावर प्राचार्य बी. एम संदीकर,उपप्राचार्य डॉ. आर .के .मस्के विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक चिदरवार , प्रा. डाॅ .बी आर दहिफळे आदींंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्रा मद्देवाड म्हणाले, लघुपटातून मराठी प्रमाण भाषे सोबतच वेगवेगळ्या बोली भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे मराठी भाषा समद्भीसाठी, लघुपट निर्मिती व महोत्सवासाठी शासन स्तावर मदतीची गरज आसल्याचे सांगीतले. यावेळी प्रा. डॉ.अर्चना मोरे, प्रा. जे.आर. कांदे,प्रा.डॉ.बी .एस. होकरने, प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेटे, प्रा. प्रवीण जहुरे, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ. दीपक चिद्दरवार यांनी केले , सुत्रसंचलन डाॅ. कोंडीबा भदाडे यांनी तर आभार बनसोडे यांनी मानले.