हावगीस्वामीत विद्यार्थ्यांसाठी ब्लॉगची निर्मिती
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावीस्वामी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी shmudiary या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला व लेखन कौशल्याला वाव मिळावा म्हणून ही अनुदिनी(ब्लॉग) सुरुवात करण्यात आली.
या ब्लॉगवर कविता,निबंध, स्वकथन, कथा ,प्रवासवर्णन, मालिका व चित्रपट परीक्षण इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना लेख लिहिता येईल. भाषांतर, वृत्तांतलेखन, पटकथा,शब्दांकन ई.रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी. हे देखील या ब्लॉग निर्मिती मागचे प्रयोजन आहे. व्यक्तिचित्रण,स्थळवर्णन, परिसरातील सांस्कृतिक ठेवा, उत्सव ,बोली भाषा आदी लेखाला महत्त्व दिले जाईल. विद्यार्थ्यांचे लेखन व्हावे, वाचन, चिंतन व निरीक्षणात गती यावी,त्यांना युनिकोडमध्ये टंकलेखन करता यावे, मुद्रित शोधण्याची दृष्टी प्राप्त व्हावी, एकंदरीत रोजगार व व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. पहिला ब्लॉग बी.कॉम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.अक्षिता परमेश्वर नरवटे यांनी लिहिला आहे. “कोरोनाकाळ आणि माझं गाव” हा पहिला लेख ब्लॉगवर प्रकाशित करण्यात आला. अक्षता नरवटे या विद्यार्थिनींच्या एकूण त्रेपन्न कविता अप्रकाशित आहेत.
पहिल्या ब्लॉगचे विमोचन झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, ब्लॉगचे समन्वयक डॉ.म.ई.तंगावार , प्रा.वीरभद्र बिरादार , प्रा.जे.डी. संपाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.