शासकीय रेखाकला परीक्षेत लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई आयोजित शासकीय रेखाकला परीक्षा – २०२२ मधील एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राॅईंग ग्रेड परीक्षेत २४५ विद्यार्थ्यांसह लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर येथील विद्यार्थी तालुक्यातून सर्वाधिक संख्येने या परीक्षेत सहभागी झाले होते.
या परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून विद्यालयचा इंटरमिजिएट ड्राॅईंग ग्रेड परीक्षेचा निकाल ९०% लागला आहे.या परीक्षेतील ‘ए’ ग्रेड श्रेणी कु. श्रेया श्रीपत सन्मुखे व कु. श्रेया सुनिल पुल्लागोर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे.तर बी ग्रेड श्रेणीमध्ये ५ विद्यार्थी आले आहेत, असे तर एलिमेंटरी ड्राॅईंग ग्रेड परीक्षेचा निकाल ९७ % लागला आहे.या परीक्षेत ए ग्रेड श्रेणी कु. वेदांती गोविंद पांडे,कु. संचिता रविशंकर कवठाळे,कु.गौरी काशिनाथ बिरादार,कु श्रध्दा श्रीकांत कुलकर्णी, कु.भंडे श्रुती नागोराव व चि.अथर्व श्रीकांत आदेप्पा या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे, तर बी ग्रेड श्रेणीमध्ये ७ विद्यार्थी आले आहेत. या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलूरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, संस्थेचे प्रशासकिय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासूणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार, शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे , मुख्याध्यापक बाबुराव आडे, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, बलभीम नळगीरकर, माधव मठवाले व सर्व शिक्षक वृदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी यांचे अभिनंदन केले आहे.