आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून प्रा. प्रेरणा होनराव यांचे अभिनंदन

आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून प्रा. प्रेरणा होनराव यांचे अभिनंदन

लातूर(एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी प्रा. प्रेरणा होनराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी अभिनंदन केले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्याकडे दिली असून मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची तर प्रा. प्रेरणा होनराव यांच्यासह राज्यभरातील नऊ जणांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. प्रा प्रेरणा होनराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला व अभिनंदन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, विजय काळे, दीपक बांगस्कर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कातळे, सोमनाथआप्पा चिल्लरगे, श्रीकृष्ण जाधव यांच्यासह अनेक जण होते.

About The Author

error: Content is protected !!