कोपरा येथील आरोपींना तात्काळ अटक करा

कोपरा येथील आरोपींना तात्काळ अटक करा

अहमदपूर शहरातील वाहतूक दोन तास ठप्प

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अहमदपूरात रास्ता रोको

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील कोपरा येथे १२ मार्च रोजी घडलेल्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा व पिडीतेला न्याय मिळवून देण्याच्या व इतर मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चच्या वतीने अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

याविषयीची सविस्तर माहिती अशी की, कोपरा येथे १२ मार्च रोजी अतिक्रमन काढण्याच्या नावाखाली सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य व गावातील इतर व्यक्तींनी एका २३ वर्षीय मुलीला अमानुषपणे मारहान करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न गावगुंडानी केला. त्यामुळे त्या २३ वर्षीय तरुणींचे आयुष्य बरबाद झाले असुन यास जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापपर्यंत अटक न झाल्यामुळे समाजाच्या भावना उफाळून आल्या आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलन करण्याची वेळ मराठा क्रांती मोर्चावर आली आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ मुख्य आरोपींना अटक करून पिडीतेला न्याय मिळवून दयावा.

कोपरा येथील प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, पिडीतेवरील खोटा अॅट्रोसटी व शासकीय कामात अडथळा हा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा., ग्रामसेवकाचे निलंबन करण्याया यावे. सरपंच व उपसरपंचाचे पद रद्द करण्यात यावे. उपसरपंच हा शासकीय सेवेत असुन त्याला निलंबीत करण्यात यावे. या प्रकरणी पिडीतेच्या बाजुने विशेष सरकारी वकीलाची नेमणुक करण्यात यावी. दिशा कायदा अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. पिडीतेचे पुर्नवसन करून दहा लाखाची तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. पिडीतेस शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने कोवीड-१९च्या नियमांचे पालन करून शांततेत रास्ता रोको करण्यात आला. या मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात येऊन जिजाऊ वंदना घेण्यात आली व रास्ता रोकोस सुरुवात करण्यात आली. व तसेच प्रशासनाला निवेदन देवून राष्ट्रगीत घेऊन रास्ता रोकोचा समारोप करण्यात आला.
यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

About The Author