किलबिल बाल आनंदोत्सव उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन दि 21 व 22 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून माजी मंत्री बाळासाहेब जाधव अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष बालासाहेब कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष डॉ गणेश कदम, शिवानंद हेंगणे, नगरसेवक बाळासाहेब लखनगिरे, संदीप चौधरी, रवी महाजन, अझहर बागवान, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा दत्ताभाऊ गलाले, संतोष रोडगे, इमरोज पटवेगर, कुलदीप हाके, प्रा हरिराम जगताप, केंद्रप्रमुख संभाजी कासले, चंद्रशेखर भालेराव, संस्था सचिव ज्ञानोबा भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात हिंदी, मराठी युगुल गीतासह लावणी, गोंधळ, शेतकरी गीत, कोळीगीत यावर बाल कलाकारांनी धरत बालकलाकारांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची मुक्त उधळण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या दिवशी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील व न्युज 18 लोकमत चे वृत्त निवेदक विलास बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील
गुणवंत व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके
तर व्यासपीठावर प्राचार्य सूर्यकांत चवळे, प्रा. डॉ. नारायण कांबळे, डॉ. पांडुरंग कदम, डॉ. ऋषिकेश पाटील, सरस्वतीबाई कांबळे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, गिरीजा कदम, माणिक कदम, रामदास कदम, बालाजी कदम जवळगेकर, गोविंद गिरी, महेश बिलापट्टे, महेश देवणे, प्रशांत भोसले, नाना कदम, रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, डॉ. मुबारक मुल्ला आदींसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पदक मिळविलेल्या जान्हवी जाधव,
राष्ट्रीय बॉल बॅडमिंटनसाठी निवड झालेल्या मानसी घोगरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून निवडून आलेल्या प्रा.डॉ. नारायण कांबळे यांचा शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या केटीसी किलबिल टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंताचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर गोडभरले, उज्वला परचंडे, सुखात्मा ढोकाडे यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी केले व आभार संस्था सचिव ज्ञानोबा भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
