डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत साजरी करावी -भन्ते पय्यानंदजी
लातूर (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कोविडच्या अनुषंगाने घातलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साजरी करण्यात यावी असे प्रतिपादन भन्ते पय्यानंदजी यांनी लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2021 च्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चा विनिमय बैठकीत मुख्य मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदरील बैठक ही शासनाने घालून दिलेल्या कोविड संबंधीत नियमांचे पालन करून घेण्यात आली. या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे माजी अध्यक्ष लाला सुरवसे, राहूलजी कांबळे, संजय सोनकांबळे, प्रा.अनंत लांडगे, पंकज काटे, साधुभाऊ गायकवाड, रणधीर सुरवसे, डी.टी.सुर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार व त्यांच्या शी चर्चा विनिमय करण्यात आली.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2021चेअध्यक्ष निखिल गायकवाड, कार्याध्यक्ष संजय ओव्हळ, उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, विजय लांडगे, अर्चना ताई आल्टे, अक्षय धावारे,विशाल पोटभरे, सुनिल मस्के, स्वागताध्यक्ष प्रा.प्रविण कांबळे, सुशिल सुर्यवंशी, सचिव राजीव गवळी, सहसचिव रूपेश गायकवाड, अॅड.प्रमोद आडसुळे, गणेश सरवदे, संघटक दत्ता कांबळे, सहसंघटक बंटी गायकवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, बाबा कांबळे,अतिश कांबळे, कोषाध्यक्ष राहूल बनसोडे, सांस्कृतिक प्रमुख अतीश कांबळे आणि प्रसिद्धी प्रमुख उमाकांत धावारे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.