दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार

दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : दि.21 मार्च रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत दयानंद शिक्षण संस्थेवर मा. लक्ष्मीरमण लाहोटी यांची अध्यक्षपदी, मा. अरविंदरावजी सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी यांची उपाध्यक्ष पदी, मा. रमेशजी बियाणी यांची सचिव पदी, मा. सुरेशजी जैन संयुक्त सचिव पदी व मा. संजयजी बोरा कोषाध्यक्ष पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच मा. दिनानाथजी भुतडा, मा. विशालजी लाहोटी, मा. अजिंक्य सोनवणे, आदिंची नियामक मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या सर्व निवडणूकीस अधिकारी म्हणून अॅड. व्यंकट बेद्रे यांनी कामकाज पाहिले. साहाय्यक म्हणून अॅड. सुहास बेद्रे, अमित कोथिंबिरे यांनी सहकार्य केले. या निवडी बद्दल दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा आज फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांची पुनश्च पदसिध्द सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. याबद्दल त्याचांही दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रा. डॉ. सुनीता सांगोले, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ.बालाजी घुटे, डॉ. सुभाष कदम, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. महेश जंगापल्ले, श्री. नवनाथ भालेराव, श्री. विकास खोगरे, श्री. गोविंद कांबळे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!