लातूर जिल्हा बँकेने केले कर्जावरील व्याज दर कमी

लातूर जिल्हा बँकेने केले कर्जावरील व्याज दर कमी

ऑनलाइन जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची घोषणा

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गुरुवारी संचालक मंडळाची प्रथमच ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीत शुभमंगल कर्ज, महीला बचत गट, छोटे ट्रक्तर या कर्जासाठी व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सांगितले शेतकरी सभासद, महीला बचत गटाला व्याजदर कमी केल्याने जिल्यातील शेतकरी सभासद बचतगट यांना मोठा दिलासा मिळणार आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते यावेळी बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संचालक आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा बँकेने kovid १९ च्या नियमाचे पालन करून प्रथमच ऑनलाइन पद्धतीने संचालक मंडळांची बैठक घेतली.

यावेळी बोलताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सांगितले की शेतकरी मुलीच्या शुभ मंगल कर्जासाठी पूर्वी ९.५० टक्के व्याज दर होता तो आज दीड टक्के कमी व्याज करून ८ टक्के दरसाल दर शेकडा व छोट्या ट्रक्तर साठी पूर्वी १०.५० टक्के व्याज होते ते आज १ टक्का व्याज कमी करून आता ९.५० टक्के व्याज दराने कर्ज देणार असून महीलाचे सक्षमीकरण व्हावे स्वनिर्भर व्हावे यासाठी बचत गटा ला कर्ज वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पूर्वी २ लाख रुपये कर्जमर्यादा होती ती आता १ लाखाने वाढ झाली आहे यापुढें ३ लाख रुपये कर्ज मर्यादा राहील तसेच बचत गटा ला जिल्हा बँक १२ तक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करत असे आता त्यात २ टक्के व्याज दर कमी करून १० टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे जिल्यातील शेतकरी, महीला बचत गट, यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीस बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, आ.बाबासाहेब पाटील, संचालक एस आर देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर, नाथसिंह देशमुख, भगवानराव पाटील, संभाजीराव सुळ, एन. आर. पाटील, अँड प्रमोद जाधव, व्यंकट बिरादार, धर्मपाल देवशेटे, सौ शिवकन्या पिंपळे, सौ स्वयंप्रभा पाटील, यशवंतराव पाटील, संजय बोरा, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सरव्यवस्थापक, सर्व विभाग प्रमुख ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक दिवंगत अँड.विश्वंभरराव माने, माजी संचालक दिवंगत व्यंकटराव कराड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

About The Author