जिल्ह्यातील सर्व पान शॉप, पान टपऱ्या व चहा टपऱ्या बंद

जिल्ह्यातील सर्व पान शॉप, पान टपऱ्या व चहा टपऱ्या बंद

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांचे आदेश

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये दि.०४.०४.२०२१ रोजीपर्यंत खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

१. लातूर जिल्हयातील सर्व जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्पलेक्स, योगा / नृत्य वर्ग, खेळाची मैदाने, सर्व क्रीडा प्रकारचे टूर्नामेंट, वैयक्तिक क्रीडा प्रकार / सराव, स्विमिंग पूल, पार्क, अम्युजमेंट पार्क, पर्यटन स्थळे, इतर करमणुकीचे ठिकाणे पूर्णतः बंद राहतील.

२. सर्व चित्रपटगृहे / व्हिडीओगृहे / नाट्यगृहै / व्हिडीओ गेम पार्लर / प्लेइंग कार्ड रूम / मंगल कार्यालये, सभागृह बंद राहतील.

३. जिल्हयातील सर्व हॉटेल्स / बार / परमिटरूम / रेस्टॉरंट याठिकाणी बसून खाण्या-पिण्यास मनाई असेल. याठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहील.

४. जिल्हयातील सर्व पान शॉप / पान टपऱ्या / चहा टपऱ्या ई. बंद राहतील.

५. दि. २९.०३.२०२१ रोजीची साजरी होणारी होळी / धुलिवंदन आणि दि. ०२.०४.२०२१ रोजीची रंगपंचमी हे प्रतिकात्मक पद्धतीने आपल्या कुटुंबात स्वगृही साजरा करण्यात यावी.

६. ऑटोरिक्षामध्ये प्रवासी संख्येची मर्यादा वाहनचालक १+२ प्रवासी तसेच अधिकृत खाजगी टॅक्सी (काळी-पिवळी जीप) मध्ये प्रवासी संख्येची मर्यादा वाहनचालक १+५ ” प्रवासी इतकी असेल.

७. खाजगी बसेस / एस. टी. / सिटी बसेस मध्ये “नो मास्क नो एन्ट्री” नियमाच्या पालनासह सिटींग क्षमतेएवढे व्यक्ती प्रवास करू शकतील. कोणत्याही परिस्थितीत शिटींग क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी.

८. संदर्भ क्रमांक ७ च्या आदेशातील सर्व निर्बंध जशास तसे दि. ०४.०४.२०२१ रोजीपर्यत लागू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ तसेच महाराष्ट्र कोव्हीड -१९ उपाययोजना नियम, २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच सदरील आदेशाची अंमलबजावणी दि. २७.०३.२०२१ रोजीपासून करण्यात येत आहे.

About The Author