सामाजिक आरोग्य राखणाऱ्या स्वच्छता दुतांनी स्वतःच्या आरोग्याचीही खबरदारी घ्यावी घ्यावी- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

सामाजिक आरोग्य राखणाऱ्या स्वच्छता दुतांनी स्वतःच्या आरोग्याचीही खबरदारी घ्यावी घ्यावी- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वच्छता हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून, स्वच्छतेचा संदेश देत स्वतः स्वच्छतेच्या कार्यात योगदान देणारे स्वच्छता दूत हे देशाचे सामाजिक आरोग्य राखण्याचे महान कार्य करतात. देशाचे आरोग्य राखणाऱ्या स्वच्छता दुतांनी स्वतःच्या आरोग्याचीही खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन व स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘ सत्कार स्वच्छता दूतांचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर नगर परिषदेचे स्वच्छता सहाय्यक हबीब मुसा चाऊस, सुनील सोनकांबळे सुपरवायझर देवीदास ससाणे, आदित्य गायकवाड , सुपरवायझर राणीताई गायकवाड आकाश गायकवाड तसेच स्वच्छता कंत्राटदार निखिल साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरपरिषद अहमदपूर येथील आकाश वाघमारे, अनिता सूर्यवंशी, माया जाधव, राजेश वाघमारे, अमोल कांबळे, किरण वाघमारे, राम नागरगोजे, प्रवीण लामतुरे, विठ्ठल नागरगोजे, अजय गायकवाड, भैय्यासाहेब भालेराव, अनिल गायकवाड,सुपरवायझर अजिंक्य गायकवाड, किरण वाघमारे, पारूबाई कासले, पदमीनबाई कासले, विमलबाई कासले, राजश्री जाधव, इंदुबाई कांबळे, सुधीर तांबटकर आदी स्वच्छता दूतांसह महाविद्यालयातील कर्मचारी वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांचाही धूळ प्रतिबंधक वस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, स्वच्छता दूत हे शहराची स्वच्छता राखतात. परिसराची स्वच्छता राखतात. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वसत असते, म्हणून स्वच्छता दूतांना शासनाने सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवाव्यात असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रमाधिकारी तथा समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!