वाढवणा येथे प्रधानमंत्री सुक्षम अन्नप्रक्रिया योजना एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

वाढवणा येथे प्रधानमंत्री सुक्षम अन्नप्रक्रिया योजना एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

वाढवणा बु (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु येथे आत्मनिर्भर भारत अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना एक दिवसीय कार्यशाळा वाढवणा येथे असंख्य शेतकरी बांधव समक्ष संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. आर. पाटील, मंडळ कृषी अधिकारी वाढवणा बु.,तर प्रमुख मार्गदर्शक डी. बी.शिंदे , प्रा. प्रशांत बिरादार, प्रा. श्याम डावळे सरपंच नागेश थोंटे, उपसरपंच ज्ञानेश्वर क्षिसागर, माजी सभापती मार्गदर्शक नितीन दूरगकर, बीटीएम उदगीर अंधारे एटीएम कृषी विभाग उदगीर, कृषी सहाय्यक प्रशांत खेळगे, संभाजी डावळे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
मार्गदर्शक डी बी शिंदे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा PMFME कसा लाभ घेता येईल? याची सखोल माहिती व मार्गदर्शन केले. उदाहरणार्थ प्रस्ताव, नियम व अटी कोणकोणती व्यवसाय करता येतात? उदाहरणार्थ तेल घाणा, बेकरी,मिरची कांडप,पिठाची गिरणी, दुग्ध प्रक्रिया, पशुखाद्य अशा विविध व्यवसायांची मार्गदर्शन बँकिंग क्षेत्राचे प्रोसिडिंग कागदपत्राची मांडणी, जागेचा आराखडा, लाभार्थी ट्रेनिंग विषयावर सखोल मार्गदर्शन एक दिवशीय कार्यशाळेत करण्यात आले. कार्यशाळेत संग्राम मिरजगावे, तानाजी हळणे, दीपक बुर्से, गंगाधर पदाजी,गजानन अष्टुरे,बालाजी तरवडे, तानाजी तरवडे, शिवा तरवडे, किरण मिरजगावे, प्रकाश जाधव, खेळगे राजकुमार, इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!