पोस्ते पोदार ठरली आदर्श उपक्रमशील शाळा.
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील नामांकित अशा पोस्ते पोदार लर्न स्कूलला रंगकर्मी प्रतिष्ठान कडून सन २०२२-२३ चा आदर्श उपक्रमशील शाळा हा राज्यस्तरावरील पुरस्कार कार्यक्रमात दिला गेला.
या प्रसंगी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री उदगीरचे आमदार संजय बनसोडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले, सिने अभिनेते कैलास वाघमारे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सुर्यवंशी ई. मान्यवर उपस्थित होते.
शाळेतर्फे हा पुरस्कार शाळेचे प्राचार्य सुर्यकांत चवळे यांनी स्वीकारला. या पुरस्कारा बद्दल पालक, शिक्षक तसेच सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.
