दापका जिल्हा परिषद शाळेत कालिका हब्बा (अध्ययन) उत्साहात साजरा

दापका जिल्हा परिषद शाळेत कालिका हब्बा (अध्ययन) उत्साहात साजरा

कमालनगर (एल.पी.उगीले) : बिदर जिल्ह्यातील कमाल नगर तालुका अंतर्गत दापका केंद्रात सरकारी आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा चवर दापका येथे अध्ययन उत्सव म्हणजेच कालिका हब्बा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास वासरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यधिपिका सौ.सुनंदा कोंगे ,शाळा सुधार समितीचे अध्यक्ष अंकुशराव वाडीकर,गौस खान होते . केंद्रातील शाळेतील सर्व निमंत्रित मुख्याध्यापक उपस्थिती होते .कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख व्यकंटराव बिरादार होते .कार्यक्रमाची सुरुवात कालिका हब्बा या अप्रतिम रॅलीने झाली.
दापका केंद्रातील सर्व शाळेतील 10 विध्यार्थी व शिक्षक सहभागी रॅलीत झाले होते. जवळपास 700 विध्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. अतिशय उत्साहात लेझीम पथकाच्या विविध कवायती व विध्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या फुगडी खेळाने रॅलीला रूप आले.
दापका केंद्र प्रमुख व्येंकंटराव बिरादार यांनी कालिका हब्बाचे उद्धेश सांगताना विध्यार्थ्यांना अध्ययनात सहजता यावी व अध्ययन मनोरंजक व्हावे. खेळातून एकता व राष्ट्रीय एकात्मता हा गुण विघार्था मध्ये यावा. अध्ययनात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विविध खेळांच्या रूपातून अध्ययन वाढवणे हा उद्देश आहे, हे सांगितले . कालिका कार्यक्रमात सतीश सावळे,सुवर्णा खंदाडे ,संजीव बिरादार ,वसंत विलासपुरे यांनी गायन करून कार्यक्रम उंचावर नेले.विद्यार्थांच्या वेगवेगळ्या स्वतंत्र संग्रामातील नेत्यांच्या वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधत होते .विविध विषयांवर आधारीत विषय कोपरे करण्यात आले होते. व यातून विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत विलासपुरे तर आभार प्रदर्शन संजीव बिरादार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद शिवाजी शिगरे,बसवचैन्न स्वामी ,अशोक जाधव मारोती बिरादार ,गुणवंत बिरादार ,अर्चना रेड्डी ,अर्चना सुरशेटवार,अर्चना शिंदे ,राजश्री कदम ,मीना मावशी ,सुप्रिया काळे यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात विघार्थी वर्गाने प्रतिसाद दिला.

About The Author

error: Content is protected !!