बिदर येथे पशू वैद्यकीय संजिवनी रुग्णावाहीनी वाटप कॅबिनेट मंत्री ना. प्रभू चव्हाण
बिदर (एल.पी.उगीले) : कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री व यादगीर जिल्हा पालकमंत्री जनसेवक विकास पुरुष ना. प्रभुजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण कर्नाटक भागातील शेतकरी बांधवांच्या ,गोमातेच्या सेवेसाठी सर्व पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून शेतकरी बांधवांना पशु संजिविनी योजनेच्या माध्यमातुन अत्याधूनिक पशुचिकित्सा सेवा देण्याचे ऐतिहासिक कार्य प्रभुजी चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातुन यशस्वी झाले आहेत.
त्यांच्या नेतृत्वामध्ये आज 68 पशुसंजिविनी चिकित्सा वाहनाचे लोकार्पण सोहळा नेहरू स्टेडियम बिदर येथे सर्व मान्यवरांच्या उपस्तिती मध्ये हा सोहळा संपन्न झाला. प्रभुजी चव्हाण यांनी पशुसंगोपन मंत्रालयामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहे. हिंदुधर्माची माता गो मातेच्या रक्षणासाठी “गो हत्याबंदी निषेद कायदा” लागू केले. देशातील पहिले “प्राणी सहाय्य केंद्र “स्थापन करणारे राज्य कर्नाटक आहे. “प्राणी कल्याण मंडळाची स्थापना शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी सर्व प्राण्यांना उचित वैद्यकीय चिकित्सा सेवा देणारे देशातील पहिले “पशुसंजिविनी योजना ” लोकार्पण करणारे राज्य कर्नाटक आहे.
भारत कृषी प्रधान देश आहे.त्याचा अवलंब करणारे कर्नाटक राज्य आहे. पशुसंगोपन ईलाखे यांच्या माध्यमातुन विविध योजनांच्या कार्याने मंत्री प्रभुजी चव्हाण यांच्या नेतृत्वात निरंतर विकासाच कार्य चालु आहे. निरंतरपने समाजाची सेवा करणा-या जननायकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या.
