फुले महाविद्यालयात विद्यार्थीनिंच्या सर्वांगीण विकासाचे प्रबोधन शिबिर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवती विकास विभागाच्या वतीने ‘विद्यार्थीनीचे प्रबोधन शिबिर ‘ संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. दुर्गादास चौधरी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सीमा उप्पलवार उपस्थित होत्या. त्यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींशी त्यांचा सर्वांगीण विकासासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. तसेच विद्यार्थीनींनी विचारलेल्या चौफेर प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन प्रेरणा दिली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत कु. ज्योत्स्ना मचकंटे, तेजश्री केजकर, प्रज्ञा रायभोळे, शेख जुफिशा, अस्मिता गायकवाड यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी महाविद्यालयाने विद्यार्थीनींसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनींनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास साधावा, तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी शिक्षण घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवती विकास विभागाचे प्रमुख डॉ. मारोती कसाब यांनी केले. तर बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. शालू जाधव हिने आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
