तळेगाव रोड बनले घाणिचे साम्राज्य – सामाजिक कार्येकर्ते महेश देवणे यांचा उपोषणाचा इशारा
अहमदपूर (गोविंद काळे) : तळेगाव रोड म्हणजे जणु काही उकिरडा बनला असून कोणीही यावे आणि टिकली मारून जावे अशी गत या रोडची झाली असून लवकरात लवकर यावर पर्याय काढावा अन्यथा आपण उपोषणास बसणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते महेश देवणे यांनी सांगितले.
नुकताच नगर पालिकेचा कार्यकाळ संपला असून नगरपालिकेवर प्रशासनाचे नियंत्रण आहे . मागिल काळात होऊन गेलेले माजी नगरसेवक किवा माजी नगराध्यक्ष यांचे कर्मचाऱ्यांवर नियत्रंण नसल्याने नगरपालिकेच्या कर्मचार्यांचाच मनमानी कारभार चालु असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
एका बाजुला स्वच्छ भारत अभियान राबवायचे तर दुसऱ्या बाजुला घाणिचे सामाज्र पसरावचे याचे कारण म्हणजे नगरपालिके मार्फत घनकचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाडी सुरु करण्यात आल्या पंरतु मध्येच कुठे माशी शिंकते समजत नाही.
घंटा गाड्या पंधरा दिवसाला महिन्याला येतात मग पंधरा दिवसाचा महिन्याचा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून शिवाजीनगर , गीताई नगर,त्रिवेणी नगर , बँक कॉलनी , भगवान नगर, टेलिफोन भवनचा भाग येथील सर्व महिला पुरुष सकाळी मॉर्निंग वॉक साठी येऊन कचरा टाकून जात आहेत तसेच शहरातून या रोड वरून जाणारे दारुच्या बाटल्या , केशकर्तनातील केस, जे काही कचरा असेल ते येथे टाकत आहेत. काही महिला या ठिकाणी घरातील खरकटे पाणी त्याच ठिकाणी टाकून जात असल्यामुळे त्या ठिकाणी डुकरांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने या ठिकाणी दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे येथील स्थायिक असलेल्या जनतेला याचा त्रास होत असून वांरवार घनकचरा कंत्राटदारास सांगुनही काही उपयोग होत नाही तळेगाव रोडने बरेच नगरपालिकेचे कर्मचारी ये – जा करतात नाकाला रुमाल लावून जातात पण त्या कचर्याकडे लक्ष देत नाहीत प्रशासनाकडे याकडे गंभीर लक्ष देण्याची आवश्यकता आहे
बरेच वेळस आपण स्वतः येथील कचरा जाळून टाकला पंरतु येथील ५ – ६ कॉलनितील लोक कचरा टाकतच आहेत. याचे कारण म्हणजे घंटा गाडी येत नाही .दोन दिवसाला का होईना घंटागाडी सुरळीत चालू ठेवून येथे होत असलेले घाण थांबवावी अन्यथा आपण या ठिकाणी उपोषणास बसणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश देवणे यांनी सांगितले आहे .
