भारतीय संविधानाच्या मूल्यांची जपणूक करा – कीर्तनकार तथा ह भ प श्यामसुंदर महाराज सोनार

भारतीय संविधानाच्या मूल्यांची जपणूक करा - कीर्तनकार तथा ह भ प श्यामसुंदर महाराज सोनार

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली असल्याचे सांगून त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूल्यांचे प्रामाणिकपणे जपणूक करा असे जाहीर आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार तथा ह भ प श्याम सुंदर महाराज सोन्नर यांनी केली. ते दि. 31 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित मराठा सेवासंघ आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून चालू असलेल्या जिजाऊ -सावित्री व्याख्यानमालेतील या वर्षीचे दुसरे पुष्प गुंफताना संत साहित्यातील संविधान मूल्य या विषयावर ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ह भ प श्याम सुंदर महाराज सोन्नर म्हणाले की, आपल्या देशामध्ये विविध जातीची, धर्माची, पंताची लोक भांडणे तंटे न करता गुण्यागोविंदाने राहात असून वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव मानला जात नसून स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्या. पसायदानातून ज्ञानेश्वराने सबंध जगाला मानवतेचा संदेश दिल्याचे सांगून पृथ्वीतलावरील कोणाचाही द्वेष मत्सर करू नका, देश सक्षम करण्यासाठी समतेचा आणि शांतीचा सर्वांनी आदर्श घ्या असे सांगितले. व्याख्यानमालेचा शुभारंभ जिजाऊ सावित्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करून जिजाऊ वंदन आदिल बागवान शेख यांनी प्रास्ताविक नाना कदम, परिचय हरीदास तम्मेवार यांनी सूत्रसंचालन रमाकांत टेंकाळे यांनी तर आभार बालाजी उच्चेकर यांनी मानले.

या व्याख्यान मालेला माजी मंत्री बाळासाहेब जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव माने,साहित्यिका ललिताताई गादगे,सत्यनारायण काळे,मोहिब कादरी,राम तत्तापूरे, शिवमूर्ती भातांभ्रे, आशा रोडगे, प्राचार्य बबनराव घोडके यांच्यासह मान्यवरांची व व्याख्यान प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्रा. गोविंद शेळके,अशोक चापटे प्रा. दत्ता गलाले, ज्ञानोबा भोसले, नाना कदम ,सिद्धार्थ दाबके, यांच्यासह मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!