केंद्रेवाडीत मातापित्यांचा पुत्रांकडून सन्मान

केंद्रेवाडीत मातापित्यांचा पुत्रांकडून सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथील चंद्रकलाबाई शिवहार केंद्रे व शिवहार नरबा केंद्रे व सगुना वसंतराव केंद्रे वसंत श्रीरंग केंद्रे या दोन जोडप्यांना त्यांचे सुपुत्र आदर्श पुरस्कार विजेते शिक्षक माधव शिवहार केंद्रे नागनाथ शिवहार केंद्रे श्रीकांत वसंतराव केंद्रे यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रति पूर्णभाव ठेवून भारतातील विविध ठिकाणी देवदर्शनासाठी पाठवले यात चारधाम बारा ज्योतिर्लिंग गंगोत्री यमुनोत्री गंगा परिक्रमा गंगासागर अशा भारतातील विविध भक्ती स्थळांचे दर्शन घडवून आणले यात ते एक महिना देवदर्शनासाठी पाठवले व त्यानंतर आपल्या जन्मभूमीत व कर्मभूमीत मोठा दिमाखदार सोहळा घेऊन आपल्या आई-वडिलांचा मोठा सन्मान केला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये हभप अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा पार पडली आवाजाचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे कैलास महाराज पवार आप्पा देशमुख श्रीकांत देशमुख माधव तांदळे माऊली मुंडे हे गायक उपस्थित होते ख्यातनाम प्रसिद्ध मृदंगाचार्य कृष्णाजी भोरकडे संतोषी डोंगरे केंद्रेवाडीचे भूषण असलेले अयोध्याताई अशोकराव केंद्रे , अशोक काका केंद्रे ,शिवाजीराव भिकाने केंद्रेवाडीच्या मा . सरपंच अनुसयाताई अनिरुद्ध केंद्रेवाडीच्या सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे ,उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे शिव व्याख्याते ज्ञानोबा भास्कर केंद्रे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करून अन्नदान वस्त्रदान करून त्यांचा दिमाखदार सन्मान केला या यावेळी मनोगत मानताना माधव केंद्रे यांनी सांगितले आई-वडिलांनी गावात पर गावात जाऊन रोजंदारी करून आम्हाला शिक्षण दिले व शिक्षक बनवले यांचे कष्ट अपार होते त्यां.ना जीवनाचा एक आनंद व ईश्वर भेट व्हावी या हेतूने कार्यक्रम घेतल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे

About The Author

error: Content is protected !!