डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात महिला पालक मेळावा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकलाताई बिरादार तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योतीताई सोमवंशी यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी ,कल्पनाताई सोमवंशी, पुष्पाताई शिंदे , अनिता परकोटे संस्था सचिव देविदास नादरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु.अ. ज्ञानोबा कुंडगीरे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. ज्योतीताई सोमवंशी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आई-बाबांच्या आचरणातून लहान मुलांवर संस्कार होत असतात. त्यांचे अनुकरण मुले करतात म्हणून पालकांचे आचरण आदर्श असावे. कुटुंबासाठी राबत असताना माता पालकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांच्या सुप्त गुणांचा वेध घेऊन त्यांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करावा. तसेच परिसरात स्वच्छता ठेवा, कॅरीबॅग वापरू नका, ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्ग लहरी झाला आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकलाई बिरादार यांनी महिला पालकांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुलता बोडके यांनी तर आभार वर्षाताई पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आम्रपाली सोमवंशी, सुनीता शिंदे, स्वाती कुलकर्णी, मनोरमा तेलंगे ,प्रशांत पांचाळ, विठ्ठल नादरगे, शशिकुमार पाटील ,रोहित बिराजदार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
