अस्थिरोग तज्ञ डॉ. विक्रम सुर्यवंशी यांना रुग्ण मृत्यू प्रकरणी पिडीतांना 40 लाख रु नुकसान भरपाई देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश !!
लातुर(एल.पी.उगीले)- खुब्याचे हाड मोडल्यामुळे केली गेलेली शस्त्रक्रियेत डॉक्टरांचा निष्काळजीपणा मुळे लातुर जिल्ह्यातील किल्लारी येथील २७ वर्षीय रेवती सतिष गावकरे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अडिच वर्षापुर्वी लातुर शहरात घडली होती. चौकशीअंती या घटनेला डॉक्टरांचां हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे शिक्कामोर्तब होताच, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. निलेश करमुडी यांच्या पाठपुराव्यामुळे व पिडिताची कायदेशीर बाजु न्यालयात मांडुन डॉक्टरांवर गुन्हा नोंद होणे हे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने लातुरातील आशीर्वाद हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.विक्रम सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी भुलतज्ञ डॉ. श्वेता सुर्यवंशी यांचा विरुद्ध एम आय डि सी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. व या आदेशान्वये गु,र.नं. ७८०/२१ कलम ३०४ अ, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद झाला.
सदर प्रकरणात मयत रेवती गावकरे या त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या कर्ता महिला होत्या. यांच्या मृत्यूमुळे झालेले आर्थिक नुकसानाची व त्यांच्या पश्यात असलेली दोन लहान मुले यांच्या पालणपोषणाची जबाबदारी मयताचे वडिल मोहन पाटील यांच्यावर आली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने मयताच्या लहान मुलांचे भविष्यातील शिक्षण, राहणे, खाणे आदी सह पालण पोषणचा खर्च व आर्थिक नुकसान भरपाई कायदेशीररित्या मिळविण्यासाठी मयताचे वडील व अज्ञान मुलांचे पालणकर्ता मोहन पाटील यांनी न्याय मिळणेकरीता रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा विधीज्ञ ॲड.निलेश एस.करमुडी यांच्या कडे संपर्क साधुन कायदेशीर लढा लढणेकरीता विनंती केली असता, ॲड.निलेश करमुडी व समितीचे विधी सल्लागार ॲड. अभय पाटील यांनी लातुर जिल्हा ग्राहक मंच येथे अस्थिरोग तज्ञ डॉ.विक्रम सुर्यवंशी व भुल तज्ञ डॉ. श्वेता सुर्यवंशी यांच्या विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. सदर प्रकरणी ग्राहक मंचात दोन्ही पक्षाच्या वतीने प्रकरण चालविले व दोन्हीही पक्षाचा अंतिम युक्तिवाद नंतर मयताच्या मुलांना आर्थिक नुकसान भरपाई मिळणे हेच न्यायोचित आहे, हे मंचाचा निदर्शनास ॲड.करमुडी यांनी आणून दिल्याने ग्राहक मंचाने डॉक्टरांनी मयत रुग्णाच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी विस लाख असे एकुन चाळिस लाख रुपये व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊन सदर ऐतिहासिक निकाल दिला. सदर निकालाचे स्वागत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा, जिल्हाध्यक्ष कावेरी विभुते, लातुर वकिल मंडळाचे सचिव ॲड दौलत दाताळ, ॲड.रामगोविंद गुणाले, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इगवे, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा, मराठवाडा अध्यक्षा पुजा निचळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजी नवरखेले, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे, मराठवाडा संघटक रवी बिजलवाड,मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगाववणे,मराठवाडा उपाध्यक्ष बलजितासिंग बावरी,लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे, विभुते,उपाध्यक्ष राम चिलमे, संंतोष सोनवणे, तसेच वकील मित्र ,ॲड.तिरुपती शिंदे, ॲड.खलिल शेख, ॲड.नितीन सौदागर, ॲड.इर्शाद शेख, ॲड डि.एस मस्के,, ॲड.एम.बी जाधव, राहुल हंतागळे, गंगाधर विसापुरे, औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार मुर्गे, आदिनी केले.
