लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी शानेवार, सचिवपदी दिपाली औटे
उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर येथील लायनेस क्लब उदगीरच्या 2023 सालासाठी झालेल्या निवडीमध्ये अध्यक्ष पदासाठी अनिता शानेवार तर सचिव पदी दिपाली औटे तसेच कोषाध्यक्षपदी सागरबाई कांबळे यांची निवड सामाजिक कार्यकर्ते अभिजीत औटे व लायन्स क्लब 2022च्या अध्यक्ष अनुराधा धोंड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी लायनेस क्लबच्या उपाध्यक्ष जयश्री स्वामी, करुणा हाळे, सहसचिव सुनिता दुंबलवार, बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिता धोंड, संगीता नेत्रगावे यांची निवड केली गेली. सदरील निवडीबद्दल उदगीर येथील उपक्रमशील विद्यालय म्हणून नामांकित असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल च्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.
