बोरगाव मंगळुर बस चालु करण्याची मागणी

बोरगाव मंगळुर बस चालु करण्याची मागणी

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु पासुन जवळच असलेल्या गुडसूर बोरगाव मार्ग मंगरूळ बस चालु करण्याची मागणी केली जात आहे. वंजारवाडी, डोंगरशेळकी,गुडसूर, बोरगाव, मंगळूर,या गावातील प्रवाशांना उदगीर, बोरगाव, मंगळूर मार्ग बस डेपो मॅनेजरने बंद केल्याने या गावातील प्रवाशांना खाजगी वहानाने जादा भाडे देऊन प्रवास करावे लागत आहे.त्यामुळे प्रवाशांत नाराजीचे सुर पसरले असुन या गावातील प्रवाशांची परेशानी होत असुन देखील संबंधित डेपोमॅनेजर बस का बंद केली ? कळाव्यास मार्ग नाही. हेतूपरस्पर अवैध खाजगी प्रवाशी वाहन या मार्गांवरून धावावे व गोरगरिबांच्या खिशाला जास्तीचे भुर्दंड बसावे, अशी इच्छा डेपोमॅनेजरची आहे की काय? अशी चर्चा वरील गावात चालु आहे. लवकरात लवकर या गावातील प्रवाशांचा विचार करून होणारी गैरसोय दुर करण्यासाठी उदगीर गुडसूर बोरगाव मंगळूर बस लवकरात लवकर चालु करावी. अन्यथा उदगीर डेपोमॅनेजर च्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून होत आहे.

About The Author

error: Content is protected !!