विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व व्यासपीठ निर्माण व्हावे – विश्वनाथराव मुडपे
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी या शाळेत एक फेब्रुवारी रोजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक ,विश्वनाथराव मुडपे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, महेश पाटील, यशवंतराव पाटील, सौ कीर्ती ताई घोरपडे नगराध्यक्षा,अमितमैया मानकरी उपनगराध्यक्ष, किशोरजी निडवंचे नगरसेवक, गणेश सोंडारे पोलिस निरीक्षक, आदित्य पाटील, अभिजित पाटील,जिवणे जनकराज, सुवर्णमालाताई पाटील, हरकंचे राजकुमार, कांबळे अनिल,शेख इम्तियाज , देविदास पतंगे,मनसुरे रमेश, रामराज मोरे ,यादुल पठाण,पठाण फतरु, पत्रकार रणदिवे लक्ष्मण, कृष्णा पिंजरे, यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन, सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पाटील होते. यावेळी मुडपे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांतील कलागुणांचा विकास करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवून आपले कलागुण दाखवावे.तसेच शाळेचे नावलौकिक करा असे म्हणाले,या कार्यक्रमात या शाळेचे शिक्षक सुर्यवंशी तुळशिराम व पत्नीचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान, गौरव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथराव मुडपे यांच्या हस्ते करण्यात आला.
या महाविद्यालयातील प्राध्यापक शेख शौकत, मलवाडे रामदास, बिरादार सतिश, शेवाळे सतिश,खिंडे सतिश, पाटील एन टी,हुमनाबादे एन बि,घोनसे ए,बि, गरड शकंर, विक्रम बिरादार, कस्तुरे रवींद्र, दयानंद कांबळे,सौ देवणीकर सरोज, बिरादार निर्मला यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा मलवाडे रामदास,तर आभार शौकत शेख यानी मांडले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका, पालक, माता, कर्मचारी, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
