वाढवणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,!! अवैध दारू अन् मटकाकिंगला जेलची वारी !!

वाढवणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,!! अवैध दारू अन् मटकाकिंगला जेलची वारी !!

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्री आणि मटका, जुगार खेळणारे आणि खेळणारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही पुन्हा ते धंदे सुरू झाल्याची शंका येताच, वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाढवणा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत. तर मटका जुगाराचे दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. इतर फरार आरोपीचा शोध वाढवणा पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

या प्रकरणाची हाती आली माहिती अशी की, वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डोंगरशेळकी तांडा येथे हातभट्टीची दारू बनवणे आणि सोयीनुसार विकणे असे प्रकार चालत असल्याची गोपनीय माहिती समजताच, वाढवणा पोलिसांच्या एका पथकाने या तांड्यावर ठिकठिकाणी धाडी टाकून आरोपी मुक्ताबाई चंद्रकांत राठोड यांच्याकडून गावठी हातभट्टी चे पाचशे लिटर रसायन ज्याची किंमत प्रति लिटर साठ रुपये प्रमाणे जवळपास 30 हजार रुपये जप्त करून पोलीस उपनिरीक्षक मुरारी किशन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 16 /23 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करून आरोपीला या अनुषंगाने अधिकृत नोटीस बजावली आहे. तसेच आरोपी अशोक पंढरी भांगे यांच्याजवळ देशी दारू भिंगरी, संत्रा कंपनीचे कागदी लेवल असलेल्या 180 एम एल च्या बारा बाटल्या प्रति बॉटल 70 रुपये प्रमाणे किंमत 840 रुपये जप्त करून पोलीस नाईक संजय शिवाजी कलकत्ते यांच्या फिर्यादीवरून गु.र.न. 15/23 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून रीतसर कारवाई केली आहे.

तसेच आरोपी संतोष रतन पवार यांच्याकडून गावठी हातभट्टीचे तीनशे लिटर रसायन प्रति लिटर साठ रुपये प्रमाणे किंमत अठरा हजार रुपये जप्त करून फिर्यादी पोलीस शिपाई बालाजी आक्केमोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष पवार यांच्याविरुद्ध गु.र.न. 17 /23 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन चालवून अवैध धंद्यावर वाचक निर्माण करण्यासाठी गेलेल्या पथकाने हळी येथून आरोपी दस्तगीर इसाक सय्यद हा कल्याण नाईट नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आल्याने मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1000 रुपये व एक इंटेल कंपनीचा साधा मोबाईल किंमत 700 रुपये असा एकूण सतराशे रुपये येवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोरखनाथ कसबे यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरुद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु. र. न. 14 /23 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच आरोपी गिरीधर रामराव कांबळे भीम नगर हळी आणि बुक्की मालक आलताफ शेख हे मिलन नाईट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम चौदाशे चाळीस रुपये व एक लावा कंपनीचा साधा मोबाईल किंमत बाराशे रुपये असा एकूण 2640 रुपयांचा यवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बालाजी आखेमोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. 13/ 23 कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा अन्वये रीतसर कारवाई करण्यात आली आहे.
वाढवणा पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!