निलंगा तालुक्यातील एलसीबीच्या पथकाने जवळपास तीन लाखाचा गुटखा जप्त, गुन्हा दाखल !! उदगीरात सर्व अवैध धंदे बिनबोभाट!!!
लातूर (एल. पी. उगीले) : लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी निलंगा तालुक्यातील वेगळ्या ठिकाणी धाडी टाकून जवळपास तीन लाख रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडून याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हाती आलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी अंगद रघुनाथ कोतवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबू वायरली तांबोळी यांच्या ए वन किराणा स्टोअर्स मध्ये ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या प्रतिबंधित सुगंधी पान मसाला, गुटखा असा एकूण एक लाख 82 हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी विरुद्ध कासार शिरशी पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच माधव लक्ष्मण बिलापट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विशेष पथकातील कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश शिवरावे यांच्या कोराळी रोडवरील स्वप्निल किराणा स्टोअर्स मधून वेगवेगळ्या कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, गुटखा असा एकूण एक लाख 16 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक डमाळे हे करत आहेत.
एकंदरीत जिल्हाभर धाडसत्र चालू असताना उदगीर शहर आणि ग्रामीण भागात मात्र सर्व काही अलबेल असल्यागत सर्व अवैध धंदे बिन बोभाट पणे चालू आहेत. याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त केले जात आहे.
