‘वैश्विक परिदृश्यातून भारत’वर फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ या विषयावर एक दिवशीय अंतर विद्या शाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय अंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचा मुख्य विषय ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ हा असून वैश्विक परिदृश्यातून भारतीय साहित्य, भारतीय प्रशासन, भारतीय राजकारण, भारतीय संरक्षण, भारतीय युद्धनीती, भारतीय इतिहास, भारतीय सामाजिक सुधारणा, हवामान बदल समस्येत भारताची भूमिका, हिंदी भाषा, साहित्य और संस्कृती, इंग्लिश फॉर्म ग्लोबल प्रिस्पेक्टिव्ह, भारतीय अर्थकारण, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय भूविज्ञान, भारतीय ग्रंथालय व्यवस्थापन व ग्रंथालय व्यवस्थापनाची आधुनिकीकरण तसेच भारतीय तत्त्वज्ञान, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, याबरोबरच वैश्विक दृष्ट्या मानवी जीवनात खेळाचे महत्व आदी उपविषयावर दि. १५ फेब्रुवारी २०२३पर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषेमध्ये शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य निमंत्रक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, यांच्यासह आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले आहे.
