लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तात्काळ रुजू होण्याचे आदेश

लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तात्काळ रुजू होण्याचे आदेश

लातूर (एल. पी. उगीले) : लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मधील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांची बदली उदगीर येथून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली आहे. तसेच संजीवन मिरकले यांची बदली एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथून शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे करण्यात आली आहे.

परमेश्वर कदम यांची बदली जळकोट पोलीस स्टेशन येथून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. उदगीर शहर पोलीस स्टेशनचे गोरख दिवे यांची बदली उदगीर येथून लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. लातूर शहर वाहतूक शाखेचे सुनील बिर्ला यांची बदली जळकोट पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे गणेश कदम यांची बदली लातूर शहर वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. लातूर नियंत्रण कक्षातील अरविंद पवार यांची बदली ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष लातूर येथील दिलीप डोलारे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा लातूर येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष लातूर येथील सोपान शिरसाट यांची बदली जिल्हा विशेष शाखा लातूर येथे करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन कासार शिरसी येथील रेवनाथ डमाले यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथील भाऊसाहेब खंदारे यांची बदली पोलीस स्टेशन किनगाव येथे करण्यात आली आहे. औसा उपविभागात वाचक असलेले रियाज शेख यांची बदली पोलीस स्टेशन कासार शिरसी येथे करण्यात आली आहे.

शिवाजीनगर लातूर येथे कार्यरत असलेले प्रवीण राठोड यांची बदली पोलीस स्टेशन शिरूर आनंतपाळ येथे तर किनगाव पोलीस स्टेशनचे शैलेश बंकवाड यांची बदली पोलीस स्टेशन अहमदपूर येथे करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक नाना दिपक लिंगे यांची बदली पोलीस स्टेशन किल्लारी येथे करण्यात आली आहे. रामचंद्र हरिश्चंद्र केदार यांची बदली अहमदपूर येथून विवेकानंद चौक लातूर येथे करण्यात आली आहे. किल्लारी येथील सुनील पांडुरंग गायकवाड यांची बदली पोलीस स्टेशन निलंगा येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष लातूर येथील विशाल शहाणे यांची बदली शिवाजीनगर लातूर येथे करण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्ष लातूर येथील संदीप कामत यांची बदली एमआयडीसी लातूर येथे करण्यात आली आहे. सदरील अधिकाऱ्यांना बदलीच्या आदेशाधिन राहून नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारावा, असे सुचित करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करण्यात येईपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. बदली आदेशाधीन वर नमूद निशस्त्र पोलीस निरीक्षक रुग्ण निवेदन करतील किंवा गैरहजर राहतील त्यांना रुग्ण निवेदन केल्याच्या दिनांकापासून स्थित कार्यमुक्त करण्यात येईल. असेही आदेश देण्यात आले आहेत.

About The Author

error: Content is protected !!