डी. आर. टी. ई फोऊडेशंन नांदेड या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे
लातूर (प्रतिनिधी) : डी. आर. टी. ई फोऊडेशंन नांदेड या संस्थेद्वारे इयता ८ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सरस्वती महाविद्यालय लातूर या महाविद्यालय मध्ये फायनाशियल लीटरसी (आर्थिक साक्षरता) कार्यशाळा आयोजित केले होते. संस्थेचे समन्वयिका मिस प्रीती आगाशे यांनी विद्यार्थ्यांना पैशाची बचत व खर्च या बाबत सविस्तर माहिती दिली. या मध्ये 9 मॉडेल असून हा टाटा कॅपिटल या संस्थेचा कोर्स असून त्या मध्ये रिटारमेंट, म्युचल फंड, इन्शुरन्सचे प्रकार, बँकेचे प्रकार, लोन या विषयी माहिती दिली असून महाविद्यालय/शाळेतील ११५० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला व भविष्यातील येणाऱ्या आर्थिक अडचणी यावर माहिती दिली व पटवून सागितले. हा कोर्स पूर्ण करून घेण्याचा मानस मुख्याधापक व शिक्षक यांनी केला. अतिशय सुंदर असा प्रतिसाद शिक्षकांनी दिला. कार्यशाळे मार्फत लातूर जिल्यातील पूर्ण महाविद्यालय व शाळे मध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे द्यावायचा मानस आमच्या संस्थेचे अध्यक्ष कृष्णा गोरे यांनी घेतला. अतिशय महत्वपूर्ण कार्यशाळा संप्पण झाली.
