ग्रामपंचायत चे दुर्लक्ष, अनेक महिन्या पासुन नाली साफ केली नाही दुर्गंधी पसरली आरोग्य धोक्यात!
वाढवणा बु. (हुकूमत शेख ) : उदगीर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचा गाव सतरा सदस्यांची ग्रामपंचायत त्यात दहा महिला सदस्य सात पुरुष सदस्य आहेत. मात्र गावात अनेक ठिकाणाहून वाल लिकेज होऊन रस्त्यावर पाणी व त्यात डुकरे, कुत्रे पाणी पिताना तर काही लिकेज पाण्यात ही डुकरे, कुत्रे मनसोक्त बसताना दिसत असुन देखील ग्रामस्थांना काळजी नाही. गाव पुढाऱ्यांना काळजी दिसत नाही. मेन रस्त्यावर व झोपड पट्टीतील रस्त्यावर लिकेज झाले असुन असंख्य लिटर पाणी वाया जात आहे, या कडे संबंधिताचे लक्ष दिसत नाही.
एकीकडे पाईप फुटून अनेक महिन्यापासून लिकेज होऊन पाणी वाया जात आहे, व डुकरे, कुत्रे बसुन पाणी दूषित करत आहेत. तेच पाणी ग्रामस्थाना नळा द्वारे सोडले जाते, तर एकीकडे अनेक दिवसापासून वार्ड क्रमांक तिन मध्ये दोन पुरुष अतीतटीच्या स्पर्धेत वार्ड वाल्यांनी मोठया विश्वासाने काम करतील म्हणुन निवडून दिले. याच वार्डातील एक सदस्य तर एक उपसरपंच आहे. पण साधी नाली पुर्ण काढून ग्रामस्थांना चालण्या फिरण्यासाठी दिली जात नाही. त्या गल्लीत दोन अपंग आहेत, फेरोज खुरेशी, व जलील बेग याला तर चालता येत नाही. 24 तास घरात बसुन राहावे लागते. नाली सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली असुन त्या डुकरे, कुत्रे बसुन गेले की पुर्ण रस्त्यावर पाणी येते, पादचारी माणसाला चालता येत नाही. लहान मुलाना, बाळांचे व जेष्ठ नागरिकांचे रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे, दुर्गंधी पसरून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या बाबी कडे संबंधित प्रशासन लक्ष देऊन लिकेज दुरुस्ती व नाली तील पुर्ण गाळ काढून वार्डातील गोरगरीब, अपंग व्यक्तींना त्रास होणार नाही. याची काळजी घेतली जाईल का? असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. नालीतील गाळ लवकरात लवकर काढून ग्रामस्थांना दुर्गंधी मुक्त करणार का नाही ? अशी चर्चा जोरात चालु आहे. वार्डातील सदस्यांनी जातीने लक्ष घालुन समस्या सोडवून मतदारांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र होतील की विश्वासघात करतील?अशी कुजबुज देखील होत असुन वरिष्ठानी जातीने लक्ष घालुन ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाली, व लिकेज काढून स्वछ पाणी दुर्गंधी मुक्त नाली करून देण्याची मागणी होत आहे.
