लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
उदगीर(एल.पी.उगीले):येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘वार्षिक स्नेहसंमेलन -२०२२-२०२३’मध्ये घेण्यात आलेल्या विविध शारीरिक क्रिडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालक नवनाथ मोरखंडे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक समन्वय समिती कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारीणी सदस्य शंकरराव लासुणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वटृट्मवार, शालेय समिती सदस्य डॉ प्रकाश येरमे,लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, बालवाडी अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपूरे, पहिली, दुसरी विभाग प्रमुख सुरेखाबाई कुलकर्णी, तिसरी, चौथी विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, संमेलन प्रमुख श्रीमती निताताई वट्टमवार,संमेलन सहप्रमुख सौ.मंजुषा पेन्सलवार ,विद्यार्थी प्रतिनिधी चि.सिध्दांत मोरखंडे व कु.नंदिनी गव्हाणे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी पाठांतर व सामुहिक कवायतीचे खडे व बैठे प्रकार सादर केले.वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत शालेय स्तरावर व शाळाबाह्य विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नवनाथ मोरखंडे यांनी लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खूप छान संस्कार देते.याचा एक पालक म्हणून अभिमान वाटतो.बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.शाळा म्हणजे जीवन शिक्षण.शिक्षणातून व्यक्तीमत्वाचा विकास केला जातो.विद्यगर्थ्यांनी आपल्या गुरुजींना आदर्श मानून आपले जीवन उज्वल करण्याचा प्रयत्न करावा,असे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी स्पर्धेतून,ती जिंकण्यातून जे ज्ञान मिळते ते कोठेही मिळत नाही.भविष्यात खूप स्पर्धांना सामोरे जायचे आहे.त्यासाठी आपला क्रमांक येईल अथवा नाही, सर्वांनी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.स्वागत व परिचय सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी तर, वैयक्तिक पद्य रमेश सातपुते यांनी गाईले.संमेलन अहवाल श्रीमती निता वट्टमवार बाईंनी सादर केला.बक्षीसप्राप्त विद्यार्थी यादी वाचन श्रीदेवी कबाडे व मेघा कुलकर्णी यांनी केले.कवायत संचलन श्याम गौंडगावे यांनी केले.सुत्रसंचलन सौ भाग्यश्री स्वामी यांनी केले तर,आभार मंजुषा पेन्सलवार यांनी मानले.
