विवेक वर्धिनी विद्यालय येथे जागतिक कर्करोग दिन व सुवर्ण प्राशन शिबीर
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील विवेक वर्धिनी विद्यालयात जागतिक कर्करोग दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकजागृती शिक्षण संस्था, वलांडीचे सचिव तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुक्याचे संचालक भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर, हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी भगवानराव पाटील, तळेगावकर, देवणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कालीदास बिरादार व त्यांचे आरोग्य पथक उपस्थित होते. सदर प्रसंगी २६० विद्यार्थ्यांना सुवर्ण प्राशन दादासाहेब व वैद्यकीय अधिकारी व पथक, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वागंबर शंकरराव कांबळे, उपप्राचार्य धनाजीराव राजे,पर्यवेक्षक दत्ताजी अचवलकर, प्राध्यापक विश्वजीत उमाकांतराव पाटील, क्रीडा शिक्षक सतिश पाटे आदींच्या हस्ते करण्यात आले.तसेच विद्यार्थी , शाळेतील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
