देवणी खुर्द अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील देवणी खु येथे शुक्रवारी सकाळी गावातील महिला,पुरुष, युवक पालकी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी काल्याचे किर्तन ह,भ,प, उमाकांत महाराज घाटनादुर यांनी किर्तन केले. तसेच देवणी खुर्द सर्व गावकरी मंडळीचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या वेळी सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, चेअरमन रतन गरड, माधव पाटे, ज्योतिबा पाटील, मनोहर पाटील, शिवाजी कारभारी, संजय गरड, रावसाहेब मुराळे, रमेश कांबळे, अनिल कांबळे, किसन पाटील,व्यंकट पाटील, सुभाष पाटील,शंकर पाटील, संदिप पाटील,राजपाल येनगे,राजू कारभारी, लक्ष्मण व्यंजने, राजाराम पाटील, नामदेव मुराळे, दिलीप पिनाटे, राम चामे,ज्ञानेश्वर पाटे, उद्धव कुमदाळे, लक्ष्मण काकनाळे, व्यंकटेश उगिले,देविदास कुमदाळे,छान मुराळे, गोविंद मेह्त्रे, पत्रकार रणदिवे लक्ष्मण, रमेश मुराळे, सतिश शिंगडे, दयानंद रणदिवे विजयकुमार पाटील, नामदेव पसरकल्ले, महोन रणदिवे, नारायण पिनाटे,सहादेव मुराळे, नरसिंग माकने,राम चामवाड, यादुल पठाण, राजु कुमदाळे, माधव मुराळे यासह सर्व गावकरी, समस्त महिला, पुरुष, युवक व बाहेरुन आलेले सर्व मान्यवर उपस्थित होते.
