नैसर्गिक साधनसंपत्ती, जैव ऊर्जाचा योग्य वापर होणे काळाची गरज – केदार खमितकर
उदगीर (एल.पी.उगीले) : भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नैसर्गिक साधन सामग्री,इंधनाची मागणी वाढत असून यामुळे भविष्यात समस्या वाढणार आहेत. या साधन संपत्तीचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती व जैव ऊर्जाचा योग्य वापर करणे, ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ऊर्जा अभ्यासक तथा ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी केले. भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ विभागाचे युवा अभियान व शिवाजी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव हे होते. तर यावेळी विचार मंचावर पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाचे प्रवक्ते किरण खमितकर, उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, अधिसभा सदस्य, आयक्वेशीचे प्रमुख तथा ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ उर्मिला शिरशी,डॉ. संजय नीटुरे यांची होती. पुढे बोलताना खमितकर म्हणाले पेट्रोल, डिझेल, गॅस, ऊर्जा अशा साधनाचा वापर गरज असेल त्या पद्धतीने करावा. विनाकारण अपव्यय करू नये.जर आज बचत केली तर उद्या आपल्याला योग्य पद्धतीने वापर करता येईल. आनंदी आरोग्यदायी जीवन जगा. युवाशक्तीने ही चळवळ पुढे चालवली पाहिजे,युवा दूत म्हणून काम केले पाहिजे. आणि राष्ट्राच्या संपत्तीची जोपासना करण्याची जबाबदारी समजावून सांगितली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपप्राचार्य डॉ.मांजरे यांनी आपण आपल्या घरापासून इंधनांच्या वापराची बचत करण्याची गरज आहे असे म्हटले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. विष्णू पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उर्मिला शिरशी यांनी तर आभार डॉ. संजय नीटुरे यांनी मानले. या कार्यशाळेमध्ये डॉ सुरेश शिंदे,डॉ एच ए तिरपुडे, प्रा ए एस टेकाळे, डॉ डी बी मुळे, डॉ.आर बी येडतकर,प्रा भगवद्गीता वैराळे,प्रा आरती गायकवाड, प्रा दिपाली गंभीरे तसेच युवा व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
