कै. रसिका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन
देवणी : कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे “युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास” या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोविंदरावजी भोपणीकर उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रवीण डोईजोडे उपस्थित होते. या कार्यक्रमास आंबेगावच्या सरपंच सौ मुक्ताबाई सूर्यवंशी, ग्रामसेवक ठोंबळताई, कै.रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम मोरे यांनी केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाल सोमानी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजय मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य व्यंकटराव शिंदे यांच्यासह राम घंटे, नारायण दोडके, आबासाहेब भद्रे, उमाकांत बोडके, अभंग शिंदे, महादेव म्हेत्रे, सुधाकर पाटील, मुख्याध्यापक संभाजी जाधव तसेच आंबेगाव येथील शिक्षक, रसिका महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
