वंदेमातरमच्या घोषणेमुळे लातूरच्या अर्थकारणाला चालना : गुरूनाथ मगे
लातूर (प्रतिनिधी) : 5 जानेवारी-केंद्र शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वंदेमातरम बोगी कारखान्याचा समावेश केला आहे. त्यामुळे लातूरच्या रेल्वेकोच कारखान्यामुळे लातूरच्या अर्थकारणाला कलाटणीच मिळणार असल्याचे मत लातूर शहर जिल्हाअध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी व्यक्त केले आहे.मराठवाडा रेल्वेकोच हा प्रकल्प लातूरात चालु व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे प्रयत्न केल्यामुळे लातूरात रेल्वे कोच प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातही केंद्र सरकारच्या वतीने 2023-2024 च्या अर्थसंकल्पात वंदेमातरम रेल्वेच्या समावेशाने लातूरच्या रेल्वे कोच प्रकल्पाना मोठी मदत होणार आहे. ही मदत या भागातील बेरोजगार युवकासाठी फायद्याची ठरणारी असली तरी यामुळे या भागातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लावणारा ठरणार आहे. या घोषणेमुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यांच्या या घोषणेचे लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विीनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दाणवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, खा. सुधाकर श्रंगारे यांचे अभिनंदन करून त्यांचे लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने गुरूनाथ मगे यांनी आभार मानले आहेत.
