आ.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!

आ.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!

अहमदपूर (गोविंद काळे ) : अहमदपूर – चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नुकताच असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अहमदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मुजमील सय्यद यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचे स्वागत करत सन्मान केला. सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात स्वागत करतो. यापुढे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहत त्यांच्या माध्यमातून आलेले समाजप्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असेल. विकास प्रक्रियेत चळवळीतील व सुशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आगामी काळात विविध विकास कामे करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची व आपल्या ताकदीची गरज आहे. असे मत या प्रवेशावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

पक्ष प्रवेशामध्ये अकबर भाई शेख, पठाण शेख, शार्दुल शेख, शाबुद्दीन शेख, शेहजाद शेख, बाबर शेख, आजम कुरेशी, सय्यद काजम, फिरोज शेख, सय्यद शेख, खलील शेख, इस्माईल कुरेशी, शंकर कांबळे, महेश कसबे, बालाजी शिंदे, अर्जुन डावरे, मनोज कांबळे, नयूम शेख, जामी शेख, समुद्दीन मुल्ला, फरीद शेख, शफीक शेख, लतीफ सय्यद, जॅकी डावरे, गौतम शेख, परवेझ शेख, दस्तगीर पटेल आदी युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रसंगी माजी सभापती शिवानंद तात्या हेंगने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, अविनाश देशमुख, सुनील ठावरे, आशिष तोगरे, सतीशराव नवटक्के, इलियास सय्यद, सादिक शेख, फेरोज शेख, नबी सय्यद, शरीफ बागवान, गजानन पवार, चंद्रकांत गंगथडे, शमसोद्दिन मुल्ला उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!