शिवलिंगआप्पा नावंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील तोंडार या ग्रामपंचायतीचे उपसरपंच नावंदेताई यांचे पती शिवलिंग आप्पा नावंदे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस सामाजिक जाणीव जपत साजरा करावा. अशी भूमिका घेऊन तोंडार येथे समाजकार्यासाठी अग्रेसिव असलेल्या ओम साई सेवाभावी मंडळाचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आपल्या परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना देखील शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावे. असा विचार करून तोंडार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या वाडी, तांड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे ठरवले.
ओम साई सेवाभावी मंडळ आणि शिवलिंग आप्पा नावंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी करलेवाडी, हनुमंतवाडी, तोंडारपाटी, वंजारवाडी या ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी ओम साई सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार दादा पांडे यांच्यासह संदीप बिरादार, रामेश्वर बिरादार, कैलास खिंडे, रमेश करले, वाघमारे, स्वामी आणि इतर सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक ही उपस्थित होते. आपण या समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक जाणीवेतून ओम साई सेवाभावी मंडळ समाज उपयोगी उपक्रम राबवत असल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे कौतुक करून आभारही मानण्यात आले.
